ठाण्यात पुन्हा ‘उबाठा’ला धक्का, ठाकरेंच्या शिलेदाराचा शिंदे गटात प्रवेश; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठी जबाबदारी.

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.ठाण्यात शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गळती कायम असून रविवारी नौपाडा येथील विभागप्रमुख प्रकाश पायरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला धक्का बसला असून पायरे यांच्यावर शिवसेना ठाणे शहरविधानसभा समन्व्यक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.नौपाडा परिसरात गेल्या १५ वर्षांपासून विभागप्रमुख म्हणून प्रकाश पायरे कार्यरत आहेत. त्यांनी एक टर्म ठाणे परिवहन समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले असून नौपाडा, विष्णूनगर, गोखले रोड आणि प्रशांतनगर भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पायरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ देत शिवसेना (उबाठा) पक्षात राहण्याचा निर्णय घेतला.

या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजन विचारे यांचा प्रचारात तसेच विविध आंदोलनात पायरे आघाडीवर होते.मात्र पराभवानंतरही पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल होत नसून येत्या काळात प्रभागाचा विकास डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश पायरे यांनी सांगितले. नववर्ष स्वागतयात्रा गोखले रोड परिसरात आल्यानंतर येथे उभारलेल्या मंचावर प्रकाश पायरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर सचिव बाळा गवस उपस्थित होते.अवघ्या महिन्याभरापूर्वीच माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्यासह शिवसेनेचे (उबाठा) ओवळा – माजिवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहरप्रमुख भास्कर बैरीशेट्टी, युवासेना चिटणीस सागर बैरीशेट्टी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपची वाट धरली होती. त्यानंतर पुन्हा प्रकाश पायरे आणि नौपाड्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने महिन्याभरात ठाकरे गटाला दुसरा झटका बसला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.