ज्या झाडाखाली भावाने आयुष्य संपवलं, ठीक दोन वर्षांनी तिथेच दादा-वहिनीने आरोपीचा काटा काढला.

गुढीपाडव्याच्या दिवशी परळी तालुक्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. भाऊ आणि भावजयने मिळून एका तरुणाची हत्या केली. या हत्येमागे त्यांनी पोलिसांत जात कारणही सांगितलं आहे.बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. ईदच्या एक दिवस आधी रविवारी, ३० मार्च रोजी मशिदीजवळ एक बॉम्ब स्फोटाची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच बीडमध्ये सोमवारी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या भावाने आणि भावजयने मिळून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.ही घटना बीडमधील परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरातील कान्हापूर येथे घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२३ मध्ये अविनाश देशमुख या तरुणाने आत्महत्या केली होती.

त्याच्या आत्महत्येला स्वप्नील उर्फ बबलू देशमुख जबाबदार असल्याचा आरोप होत होता. या प्रकरणी स्वप्नील उर्फ बबलू देशमुखवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अविनाश देशमुखच्या आत्महत्येप्रकरणी स्वप्नीलवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील आत्महत्या केलेल्या अविनाशच्या कुटुंबीयांवर दबाव टाकत होता.स्वप्नील सतत दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी आत्महत्या केलेल्या अविनाशच्या कुटुंबीयांना त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून अविनाशचा भाऊ धनंजय देशमुख आणि भावजय सोनाली देशमुख यांनी स्वप्नीलची गळा चिरुन आणि दगडाने ठेचून हत्या केली.

महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या झाडाला अविनाश देशमुखने गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं, त्याच ठिकाणी, त्याच झाडाखाली अविनाशच्या भाऊ आणि भावजयने स्वप्नीलचा काटा काढला. अविनाशने आत्महत्या केलेल्या झाडाखालीच त्याला संपवलं.गुढीपाडव्याच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हत्या केल्यानंतर धनंजय आणि सोनाली स्वतःच सिरसाळा पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, स्वप्नीलच्या त्रासामुळेच हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला, अशी प्राथमिक माहिती याप्रकरणी समोर आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.