माझं शेवटचं तोंडही बायकोला दाखवू नका, तलाठ्याचं व्हॉट्सॲप स्टेटस, गुढीपाडव्याला आयुष्य संपवलं.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तलाठीने आयुष्य संपवल्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. तलाठीने मृत्यूआधी आपल्या व्हॉट्सॲपला स्टेट्स ठेवून आत्महत्येचं कारणही सांगितलं.घरगुती कलहाच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल होत असतात, यात महिलांच्या तक्रारी अधिक प्रमाणात समोर येतात. पण पत्नीच्या त्रासाला कंटाळून अकोल्यातील एका तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.अकोल्याच्या तेल्हारा शहरातील शाहू नगर या भागात राहणारे तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी ३० मार्चला तेल्हारा – शेगाव मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागे गळफास घेत जीवन संपवले.तेल्हारा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत असलेले शिलानंद माणिकराव तेलगोटे हे तेल्हारा शहरातील शाहूनगर भागात आपल्या कुटुंबासह राहत होते. पत्नीच्या त्रासापायी कंटाळून तिच्याच नावाने व्हॉट्सॲपला स्टेट्स ठेवून गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे.पत्नी आपल्या मुलांसमोर अश्लील शिवीगाळ करून सतत फाशी घे असं म्हणत असल्याचं त्याने या मृत्यूपूर्व स्टेट्सवर नमूद करून ठेवलं आहे.

पत्नीच्या भावाला शेती घेण्यासाठी व्याजाने पैसे काढून दिलेत, परंतु तो ते परत करत नसल्याने त्याचं व्याज आणि मुद्दल रक्कम त्याच्या पगारातून कपात होत असल्याचाही उल्लेख त्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर करण्यात आला आहे. फाशी घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या स्टेट्सवर त्यांनी असंही लिहिलंय, की गेल्या पाच दिवसांपासून जेवण सुद्धा केलं नाही. आपला चेहरा पत्नीला दाखवण्यात येऊ नये असंही स्टेटसमध्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तीने सांगितलं आहे.’मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे, वय ३९, रा. तेल्हारा शाहु नगर गाडेगाव रोड तेल्हारा. मी दि ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे.

माझया मुत्यु माझी पत्नी नामे प्रतिभा तेलगोटे हे असुन मला खुप असलिन शिवया देते माझया मुला समोर आणि मला फाशी घेय असे वांरवार सांगते माझे पैसे तिचा भाउ श्री प्रविण गायगोले असुन त्यांच्या कडे त्यांना शेती सांठी मी काही रक्कम दिली सदर रक्कम मी तलाठी सो कडुन काढली त्यांचे व्याज व्याज सह रक्क्म देने अपेशीत आहे कारण माझया पगार मूधुन रक्कम कटोती सुरु आहे माझया मुत्यु झयाालांस माझी शेवटची ईच्छा माझो PM होणार नाह चहेरा… चहेरा चहेरा माझी पत्नी ला दाखु नोय कारण आज मी ५ दिवस झाले मी जेवन केले नाही माझी पत्नी ला सोडुन कोणही पाहीला तर चालले कारण माझी पत्नी’.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.