खार पोलिसांनी कुणाल कामराला बजावला समन्स, चाैकशीसाठी हजर राहण्याची शक्यता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या कवितेमुळे चर्चेत आलेला कुणाल कामरा हा आज खास पोलिस ठाण्यात हजर राहू शकतो. अटकेपासून त्याला संरक्षण मिळाले आहे. खार पोलिस ठाण्यात त्याच्यावर वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत. कुणाल कामराला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर कुणाल कामराहा चर्चेत आलाय. हेच नाही तर कुणाल कामरावर काही गुन्हे देखील दाखल करण्यात आली. कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये ही कविता रेकॉर्ड केली, त्या हॉटेलची शिवसैनिकांनी तोडफोड केली. कुणाल कामराने आपल्या कवितेतून शिंदेंना गद्दार म्हटले. कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. कुणाल कामराने यानंतर थेट कोर्टात धाव घेतली. संजय राऊत यांनी कुणाल कामराला कायद्याला सामोरे जाण्याचा सल्ला दिला.हेच नाही तर संजय राऊत यांनी म्हटले की, मी कुणाल कामराच्या संपर्कात आहे तो काही देशद्रोही नाहीये.

शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर आणि गुन्हे दाखल होताच कुणाल कामराने मुंबईतून पळ काढला. खार पोलिसांनी कुणाल कामराला एक नोटीस देखील पाठवली. कुणाल कामराची खार पोलिसांकडून चाैकशी केली जाणार आहे. मुंबईत गेल्यावर माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याने याचिका दाखल केली होती.खार पोलिसांच्या चाैकशीसाठी हजर राहण्यासाठी कोर्टाने कुणाल कामराला वेळ दिला होता. आता आज कुणाल कामरा हा खार पोलिस ठाण्यात चाैकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे.

अटकेपासून संरक्षण मिळाल्याने तो आज चाैकशीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आज चाैकशीला हजर राहण्यासाठी खार पोलिसांनी त्याला समन्स बजावल्याचीही माहिती मिळतंय.आता आज कुणाल कामरा हा चाैकशीसाठी हजर राहणार की नाही हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. कुणाल कामरावर आतापर्यंत चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे खार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत. कुणाला कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कवितेचा व्हिडीओ संजय राऊत यांनी सर्वात अगोदर सोशल मीडियावर शेअर करत कुणालची कमाल म्हणून शेअर केला. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरावर टीका केली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.