शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर क्रिकेटवरील सट्टा तेजीत, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच.

नांदेड शहर व ग्रामीण भागात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरू असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही सट्ट्याचे लोण ग्रामीण भागात वाढले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी फ्लश आऊट योजना लागू केली असताना, अद्याप सट्ट्यावर प्रभावी कारवाई झालेली नाही.आयपीएल क्रिकेट सामन्यांवर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या असल्या तरीही स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यात यापूर्वी अनेक वेळा कारवाई करण्यात आली. वजिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हेही दाखल आहेत. पूर्वी हा प्रकार शहरापुरता मर्यादित होता, परंतु त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे.

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर शहर आणि ग्रामीण भागांमध्येही सट्टा लावण्याचे प्रमाणात चांगलेच वाढल्याचे सध्या चित्र बघायला मिळतंय.अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या मदतीने सुरू असलेल्या सट्ट्याच्या व्यवहाराबाबत लक्ष वेधले होते. २९ मार्च रोजी जालना पोलिसांनी सट्टा खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली होती. यातील काही आरोपी नांदेड शहरालगतच्या हिंगोली जिल्ह्यातील आहेत. नांदेड शहरातल्या वजिराबाद, जुना मोंढा, गाडीपुरा, मालटेकडी आदी परिसरात काही जण सामन्यावर सट्टा चालवतात.

पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी सट्टा चालकांनी नवीन मोबाइल अॅप तयार केले आहे.त्यावर वेगवेगळे कोडवर्ड वापरून हा व्यवहार होतो. पैसा लावल्यानंतर संबंधित व्यक्तीला आठ दिवसानंतर रक्कम दिल्या जाते, अशी सूत्रांची माहिती आहे. लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या अवैध व्यवसायात शहरातील अनेक डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी सहभागी असल्याचे सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जिल्ह्यातल्या अवैध व्यवसायावर अंकुश मिळविण्यासाठी फ्लश आऊट योजना आणली.त्यांतर्गत अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली, पण क्रिकेट सामन्यावर सट्ट्याबाबत अद्याप पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेडसह हदगाव, किनवट, बिलोली, भोकर आदी पोलिस ठाण्यांर्तगत क्रिकेट सामन्यावरील सट्टा जोरात सुरू असल्याचे सांगण्यात आले. नांदेड जिल्हा पोलिस दलाची वार्षिक तपासणी शुक्रवारी झाली. विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत खेद व्यक्त केला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.