विवाहबाह्य संबंधातून उपजिल्हाधिकाऱ्याचा पत्नीकडून छळ, जादूटोणा केल्याचाही आरोप, खाण्यातून…

 उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी सारिका आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने विवाहबाह्य संबंध टिकविण्यासाठी जादूटोण्याचा वापर करून पतीचा छळ केला. संशयास्पद वनस्पतींचा आहारात वापर केला. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.विवाहबाह्य संबंध टिकविण्यासाठी पतीने विरोध करू नये, यासाठी त्याच्यावर जादूटोण्याचे प्रयोग करण्यासह पतीचा छळ केल्याचा प्रकार उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकारी याच्यासोबत घडला आहे .विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यानंतर पत्नीच्या प्रियकराने उपजिल्हाधिकारी याच्यावर पिस्तुल उगारल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या तक्रारीवरून सारिका देवेंद्र कटके (वय ४७, रा. जालाननगर), विनोद कैलास उबाळे (वय ३८, रा. बोरखेडी जि. जालना)

आणि अतिश साहेबराव देशमुख (वय ४२, रा. धाराशिव) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सारिकाच्या मोबाईलमधील संभाषणावरून आपल्यावर जादूटोणा होत असल्याचे कटके यांच्या लक्षात आले. त्यांनी घराची झडती घेतली असता गादीखाली काळे लिंबू, सुई टोचलेली बाहुली, फुलदाणीत बिब्बे, राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे अघोरी साहित्य; तसेच खाण्यातून दिल्या जाणाऱ्या संशयास्पद वनस्पती आढळल्या. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात देवेंद्र तुकाराम कटके (वय ५०, रा. जालननगर) तक्रार दिली.उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना खाण्यातून संशयास्पद वनस्पती देत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. देवेंद्र कटके यांनी आपल्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात थेट पोलिस ठाण्यातच धाव घेतलीये. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हा केला जातोय. पोलिस तपासात याबद्दल काही मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.पत्नीच्या मोबाईलवरील बोलण्यावरून कटके यांना संशय आला आणि पुढे जे काही घडले ते अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारे नक्कीच होते. गादीखाली त्यांना ज्या गोष्टी दिसल्या त्याची साधी कल्पना देखील कोणी केली नसावी. एका मोठ्या पदावरील प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्याने चर्चांना उधाण आल्याचे देखील बघायला मिळत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.