दारुड्या पतीच्या त्रासामुळे पत्नी माहेरी, नंतर आईनेच सुपारी देऊन मुलाचा काटा काढला; हैराण करणारं कारण समोर.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दारुचं व्यसन असलेल्या पतीला पत्नी सोडून गेली. नंतर दारुड्या मुलाची त्याच्या आईनेच सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे.पती दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने पत्नी मुलांना घेऊन माहेरी आली. दारू पिऊन आलेला मुलगा आईकडे चुकीची मागणी करू लागला. यामुळे त्रस्त आईने दारुड्या मुलाची २० हजारांची सुपारी देऊन काटा काढला. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील नारळा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आईसह २ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अमोल याचा अठरा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी नगर येथील महिलेशी विवाह झाला होता. त्याला एक सोळा वर्षाची मुलगी आणि एक नऊ वर्षाचा मुलगा आहे. अमोलच्या वडिलांचं निधन झालं असून त्याची आई आणि तो वेगवेगळे राहत होते.अमोलला दारूचं व्यसन होतं.

तो दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे तिघे सात महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे तिच्या माहेरी निघून गेली होती. अमोल हा दारूच्या प्रचंड आहारी गेला होता. दारू पिऊन तो आईला त्रास देत चुकीच्या मागण्या करत होता. ही बाब चंद्रकला यांनी शेजारच्या महिलेला सांगितली. असा मुलगा असेल तर त्याला मारून टाका, असं त्या महिलेने सांगितले. यावरून चंद्रकांत हजारे यांनी किरण याला वीस हजार रुपयांत अमोल याची सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.अमोल लक्ष्मण हजारे, वय वर्ष – ३५, राहणार नारळा, तालुका पैठण, असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

तर चंद्रकला लक्ष्मण हजारे, वय वर्ष – ६०, किरण रोहिदास गायकवाड, वय वर्ष – २५, राहणार नारळा, विजय कचरू जाधव, वय वर्ष – ३४, राहणार मिटमिटा पडेगाव, मंदाबाई बापूराव जानकर वय वर्ष – ४५, राहणार नारळा, अशी आरोपींची नावं आहेत.पैसे घेऊन किरण गायकवाड याने विजय जाधव याला सोबत घेतलं. अमोलचा पाठलाग करून त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने संत एकनाथ उद्यानात घेऊन गेले. या ठिकाणी त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडात चिखल टाकला. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये ही बाब उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.