गळ्याभोवती व्रण असल्याने प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या केल्याचा संशय होता. अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दारू विक्रेत्याने अंढेरा पोलिस ठाण्याच्या शिपायाची हत्या (Buldhana Crime) केल्यानंतर आठवडाभरातच; रविवारी एका पोलिसाचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला. स्वतःच्याच स्विफ्ट डिझायर कारमध्ये चालक सीटवर गळा आवळून पोलिसाची हत्या (Police Murder) करण्यात आली. ज्ञानेश्वर म्हस्के (४२) असे मृत पोलिसाचे नाव आहे.म्हस्के जालना महामार्ग पोलिस दलात कार्यरत होते. देऊळगाव राजा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचीही चर्चा रंगली आहे.










