संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी! पतीने दारू ढोसली अन् साखरझोपेत असलेल्या पत्नीला सपासप वार करून संपवलं.

चारित्र्यावर संशयावरून पतीनं पत्नी झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशयावरून पतीनं पत्नी झोपेत असतानाच कुऱ्हाडीने वार करत तिचा निर्घुण खून केल्याची खळबजनक घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात घडली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. खून केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय. सोमनाथ सोनवणे या व्यक्तीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नी शितल सोनवणे हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्घृण खून केलाय. या घटनेत दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावलाय, मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झालीय. सोमनाथ सोनवणे हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता.

नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जात नव्हते. रात्री त्याने मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शितल झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात शितल गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मृत्यूसोबत तिची झुंज अपयशी ठरली. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अविश्वास, संशय आणि दारूच्या आहारी जाऊन एका कुटुंबाचा सुखी संसार उद्ध्वस्त झालाय. आता या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कारवाई होईल, त्याला शिक्षा देखील होईल. परंतु या संपूर्ण प्रकरणात सोमनाथ आणि शितलच्या दोन निष्पाप मुले आता मात्र, आई आणि वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहेत. संशयाच्या भुताने एका सुखी संसाराची राख रांगोळी केल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.