जमिनीचा हिस्सा दिला नाही, तर… मुलाकडून वडिलांना बेदम मारहाण, घटनेने परिसरात खळबळ.

मुलानेच वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे. मुलाने वडिलांना जमिनीच्या हिस्स्यावरुनही धमकी दिल्याचं समोर आलं आहे.एका घरातील तरुणाने त्याच्या वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा वडिलांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. मारहाण करणारा मुलगा नशेच्या आहारी गेल्याची माहिती आहे.रविवारी दुपारी ही घटना समोर आली. आपल्या वडिलांच्या गळ्यात झोपाळ्याची रश्शी टाकून मुलगा त्यांना मारहाण करत होता. घरातील कुटुंबीय मुलाला मारहाण करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण मुलगा आपल्या वडिलांना सतत मारहाण करत होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

सध्या याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील जमुनिया गावात ही घटना घडली आहे. व्यसनी, नशेत असलेल्या मुलाने वडिलांना अतिशय मारहाण केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.वडील व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजता आपल्या घरातच होते. त्यावेळी त्यांचा मुलगा बाहेरुन आला आणि त्याच्या पत्नीला खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी जबरदस्ती करू लागला. त्याच्या पत्नीने दरवाजा न उघडल्याने तो शिवीगाळ करू लागला.

तो सतत नशेत असल्याने वाद करायचा, त्यामुळेच त्याच्या पत्नीने दरवाजा उघडला नाही.मुलगा सतत शिवीगाळ करत असल्याने वडिलांनी त्याला थांबवलं. त्यानंतर मुलाने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने वडिलांना पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्याने वडिलांना बोलताना सांगितलं, की मला जमिनीचा हिस्सा दिला नाही, तर सर्वांना ठार करेन अशी धमकीही त्याने दिली. मुलाकडून झालेल्या मारहाणीत वडिलांच्या मान, खांद्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मारहाण करणाऱ्या आरोपी मुलाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. वडिलांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या जबाबानंतर तसंच व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.