पुण्यातील घटनेची ‘पुनरावृत्ती’; नागपुरात एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; घटनेनं खळबळ.

एसटीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. एसटीच्या चालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी उमरखेडचे बसचालक संदीप कदम (४०) याला अटक केली आहे.आरोपी कदम हा नागपूर बसडेपोत चालक म्हणून कार्यरत आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी अकरावीला आहे. ती आरोपीच्या ओळखीची आहे. ती शनिवारी, २२ मार्च रोजी उमरखेड बसस्थानकावर बसची वाट पाहत होती. त्याचवेळी संदीप तिथे आला. त्याने तिला कुठे जात आहे, असे विचारले असता तिने नांदेडला जात असल्याचे सांगितले. संदीपने तिला सोडून देतो असे सांगत नांदेडला नेले.

तिथून तो नागपूरला घेऊन आला. रविवारी पहाटे ५ वाजता बस नागपूरला पोहचली. तिला संदीप खोलीवर घेऊन गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. नंतर नागपूर-सोलापूर या बसने तिला उमरखेडला सोडून दिले.मुलगी घरी आली नाही म्हणून तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी चौकशी सुरू केली. पीडित मुलगी ही संदीप कदम याच्यासोबत उमरखेडला दिसल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्याला उमरखेड बसस्थानकावर अटक केली. भादंवि कलम १३७ (२) ६४ ( १) ९६ भारतीय न्याय संहितासह ४, ८, १२ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.या प्रकरणात उमरखेड पोलिसांनी संदीप कदम याला अटक केल्याची गंभीर दखल एसटी प्रशासनाने घेतली आहे. या सर्व प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत संदीपला सोमवारी निलंबित करण्यात आले.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.