पिठाच्या गिरणीत माणुसकीही भरडली; १० वर्षीय मुलीसोबत कामगाराचं भयंकर कृत्य, खाऊचे आमिष दाखवलं अन्…

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर पहाटे झालेल्या बलात्काराच्या घटनेस आज, मंगळवारी एक महिना पूर्ण होत असतानाच ही घटना घडल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.वाघोली परिसरात शाळेत निघालेल्या दहा वर्षीय मुलीवर पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या कामगाराने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाघोली पोलिसांनी या २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर पहाटे झालेल्या बलात्काराच्या घटनेस आज, मंगळवारी एक महिना पूर्ण होत असतानाच ही घटना घडल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आरोपीवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात सकाळी सातच्या सुमारास पीडित मुलगी घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती.

वाटेवरील पिठाच्या गिरणीत नराधम कामगार काम करतो. चिमुरडी शाळेत जात असताना नराधमाने तिला खाऊचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला गिरणीच्या दिशेने घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.त्यानंतर संबंधित चिमुकली शाळेत न जाता रस्त्यावर येऊन रडत होती. स्थानिकांनी तिला शांत करून विचारणा केली. त्या वेळी तिने सर्व प्रकार सांगितला. यानंतर नागरिकांनी दक्षता दाखवून पोलिसांना कळविले. नराधमाला ताब्यात घेऊन वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधितावर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

घरात घुसून युवकाने २९ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. र जेहित राजेश घागरे (वय २४, रा. पारडी), असे अटकेतील युवकाचे नाव आहे. रोहित हा पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करतो. तो तिचा नेहमी पाठलाग करायचा. तिला मैत्री करण्याबाबत म्हणायचा. तरुणीने मैत्री करण्यास नकार दिला. रविवारी रात्री रोहित हा तरुणीच्या घरात घुसला. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. शिवीगाळ करून तिला धमक दिली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत रोहितला अटक केली.

  • Related Posts

    जळगाव पोलीस पुन्हा चर्चेत : थेट एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील संशयिताशी मोबाईल संवाद !

    जळगाव पोलीस दल नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक प्रकरणामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलिसांची मान खाली गेली आहे. जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या…

    पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

    पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    ‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा.

    ‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा.

    संशयाने संसाराची राखरांगोळी! आधी पत्नीला संपवलं, चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने पोलिस ठाण्यातच… पुणे हादरलं.

    संशयाने संसाराची राखरांगोळी! आधी पत्नीला संपवलं, चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने पोलिस ठाण्यातच… पुणे हादरलं.