स्वारगेट अत्याचार प्रकरणात अत्यंत मोठी माहिती पुढे, आठ अधिकाऱ्यांवर कारवाई.

पुण्याच्या स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर दत्तात्रय गाडे या गुन्हेगाराला अटक करण्यात आली. या प्रकरणात अत्यंत मोठे खुलासे करण्यात आली. सराईत गुन्हेगाराने मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.पुण्याच्या स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मुलगी पुण्यातून आपल्या मुळगावी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. ती पहाटेच्या सुमारास बसची वाट पाहत होती. यावेळी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे हा मुलीजवळ आला आणि ताई कुठे जात असल्याची चाैकशी करून तिचा विश्वास संपादन केला. यावेळी गाडेने मुलीला म्हटले की, फलटणला जाणारी बस मागे दुसरीकडे लागलीये. खोटे बोलून तो मुलीला बंद शिवशाही बसमध्ये घेऊन गेला.मुलीच्या मनात शंका येताच तिने म्हटले की, बसमध्ये अंधार दिसत आहे. त्याने आतमध्ये जाऊन तिला बघण्यास सांगितले. मुलगी बसमध्ये चढताच त्याने तिच्यावर अत्याचार केला. हेच नाही तर तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पोलिसांनी काही तासांनंतर आरोपी दत्रात्तय गाडे याला अटक केली.

तो या घटनेनंतर आपल्या गावातील ऊसाच्या शेतात जाऊन लपला होता. हेच नाही तर त्याने त्याचा फोनही टाकून दिला.स्वारगेटमध्ये घडलेल्या या अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांवर जोरदार टीका देखील करण्यात आली. आता या घटनेनंतर मोठी कारवाई करण्यात आल्याचे बघायला मिळतंय. एसटी आगारातील आठ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. एसटी प्रशासनाच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आता थेट बदल्या करण्यात आल्या.

यामध्ये प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांचाही समावेश आहे.या प्रकरणानंतर काहींना नोटीसही पाठवण्यात आली. स्वारगेट आगारात शिवशाही आणि शिवनेरी बसमध्ये चुकीच्या घटना घडत असल्याचे या प्रकारानंतर उघडकीस आले. अनेक कपडे आणि दारूच्या बॉटल्स बसमध्ये आढळल्या. हेच नाही तर सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे हा रात्री दीड वाजल्यापासून स्वारगेट बस आगारात फिरत होता. दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या गणवेशात पीएमपी आणि एसटी बसस्थानकात फिरत असे. दत्तात्रय गाडे याचे अनेक कारनामे हे पुढे येताना दिसत आहेत. पोलिसांना चाैकशीत तो उडवाउडवीचे उत्तरे देत आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.