सिन्नरचं कुटुंब तुळजापूरला निघाले, वाटेत कार डिव्हायडरला धडकली, ५ वर्षांच्या चिमुरडीसह दोघांचा मृत्यू.

तुळजापूरला दर्शनाला जाणाऱ्या एका कुटुंबाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीसह दोघांनी आपला जीव गमावला आहे.नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील लोणारे कुटुंब तुळजापूरला दर्शनाला जात होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने त्यांची मारोती इको कार डिव्हायडरवर जोरदार धडकली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना गेवराई जवळील रांजणी फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ३ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे.नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर येथील लोणारे कुटुंब तुळजापूर येथे देवदर्शनाला जात होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने गाडी थेट गेवराईजवळ असलेल्या रांजणी फाट्याजवळ असलेल्या डिव्हायडरला धडकली.अपघातात श्रावणी योगेश लोणारे (४), शंभू योगेश लोणारे (१.५), समर्थ योगेश लोणारे (१०), पुजा रामेश्वर लोणारे (२८), रामेश्वर पोपट लोणारे (३७), पुनम योगेश लोणारे (३७), ईश्वरी रामेश्वर लोणारे (५), दत्तात्रय सोमनाथ आडभाई (४५) हे आठ जण जखमी झाले. तर योगेश पोपट लोणारे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना रूग्णालयात दाखल केल्यानंतर यातील ईश्वरी रामेश्वर लोणारे या ५ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर होती. उपचारा दरम्यान काल दुपारी १२.०० च्या दरम्यान तिचाही मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकसेवा मंडळाचे नारायण पवार सह आदींनी मदत केली. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बहुमजली इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी साफ करताना एका कर्मचाऱ्याचा शनिवारी मृत्यू झाला. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आनंदनगर भागात ही दुर्घटना घडली.आनंदनगर येथील ए. पी. शहा महाविद्यालयाच्या मागे असलेल्या राज रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समधील ‘टिक वूड ए-१’ सोसायटीत पाण्याची टाकी साफ करण्याचे काम सुरू होते.

या १० मजली इमारतीत ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचा कर्मचारी अनमोल भोये टाकी साफ करत होता. या कामादरम्यान तो बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व बाळकूम अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी अनमोलला टाकीबाहेर काढून ओवळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनमोलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.