सौरभच्या हत्येत मिडाझोलमचा वापर; मेडिकलमध्ये मुस्कानसोबत गेलेला ‘तो’ वृद्ध कोण? संशय वाढला.

मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडानं देशभरात खळबळ उडाली आहे. मर्चंट नेव्हीत काम करणारा सौरभ राजपूत त्याच्या लेकीच्या वाढदिवसासाठी लंडनहून मेरठला आला होता. तेव्हा त्याच्या पत्नीनं विवाहबाह्य संबंधातून त्याची हत्या केली.मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडानं देशभरात खळबळ उडाली आहे. मर्चंट नेव्हीत काम करणारा सौरभ राजपूत त्याच्या लेकीच्या वाढदिवसासाठी लंडनहून मेरठला आला होता. तेव्हा त्याच्या पत्नीनं विवाहबाह्य संबंधातून त्याची हत्या केली. पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिलनं सौरभची हत्या केली. त्याचे १५ तुकडे करुन निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये ठेवले. त्यानंतर ड्रम सिमेंट भरुन बंद करण्यात आला.सौरभ राजपूतच्या हत्येत मिडाझोलम इंजेक्शनचा वापर करण्यात आला. आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलं जाणारं मिडाझोलम इंजेक्शन डॉक्टरांचं प्रिस्क्रिब्शन असल्यावरही मिळत नाही.

पण तरीही मेरठच्या खैरनगरात या इंजेक्शनची प्रिस्क्रिब्शनशिवाय सर्रास विक्री होते. सौरभच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं इंजेक्शन खैरनगरमधील ऊषा मेडिकलमधून खरेदी करण्यात आलं होतं.आपण मानसिक तणावातून जात असल्याचं सांगून मुस्काननं झोपेच्या गोळ्या लिहून आणल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. अरविंद देशवाल यांचा जबाब घेतला. ‘डॉक्टरांनी प्रिस्क्रिब्शनमध्ये झोपेच्या गोळ्या लिहून दिल्या नव्हत्या. यानंतर गुगलवर बघून डॉक्टरांकडे असलेल्या कागदावर स्वत: मुस्काननं झोपेच्या गोळ्या आणि इंजेक्शनबद्दल सर्च केलं. तिनं मिडाझोलम इंजेक्शनचा उल्लेख डॉक्टरांच्या चिठ्ठीत केला. त्यानंतर एका वृद्धाला घेऊन ती खैरनगरातील ऊषा मेडिकल स्टोअरमध्ये गेली. तिथून तिनं झोपेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची खरेदी २२ फेब्रुवारीला केली,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.मिडाझोलम इंजेक्शनचा उपयोग आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरमध्ये केला जातो. डॉक्टरांचं प्रिस्क्रिब्शन असलं तरीही हे इंजेक्शन मिळत नाही. मिडाझोलम इंजेक्शन खरेदी करायचं असल्यास डॉक्टरांनी त्याचा उल्लेख हॉस्पिटलच्या कागदावर करावा लागतो. त्यानंतरच मेडिकल स्टोर चालक इंजेक्शन देऊ शकतो. पण ऊषा मेडिकल स्टोरच्या संचालकानं डॉक्टरांच्या चिठ्ठीवर इंजेक्शन दिलं. याचाही तपास आता पोलीस करणार आहेत.डॉक्टरांची चिठ्ठी पाहून आम्ही झोपेचं इंजेक्शन दिलं. ती एका वृद्धाला सोबत घेऊ आली होती. आम्ही नियमानुसार चिठ्ठी पाहून औषध दिलं, असं ऊषा मेडिकलच्या अमित जोशींनी सांगितलं. मुस्कान रस्तोगी नेमकी कोणाला घेऊन मेडिकलमध्ये गेली होती, त्याचा तपास आता पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.