फैजपुर पुलिस स्टेशन तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन संपन्न. फैजपुर , तालुका यावल दि. 21 मार्च २०२५ रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास हे करत असतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने आज फैजपुर पोलीस स्टेशन येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. फैजपुर गाव म्हणजे एकता चे प्रतीक या ठिकाणी सर्व धर्मीय नागरिक राहतात.
या इफ्तार पार्टी ला मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात दुआउभ (प्रार्थना) पठण करून रोजा इफ्तार करण्यात आला ह्या कार्यक्रमात प्रामुख्याने अब्दुल रऊफ जनाब जमात-ई-इस्लामी चे फैजपुर शहर अध्यक्ष,P K चौधरी, भगवान चौधरी, कुर्बान,शेख ,
केतन तिरंगे,कलीम, मणियार,अनवर खटीक,शेख रियाज, डॉक्टर इमरान, क़दर जनाब,कैफ खान,शेख अहमद(mpj), इरफान शेख, SIO युथ विंग चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी फैजपूर पोलिस स्टेशन सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, उप निरीक्षक सैय्यद मैनुद्दीन, फैजपूर पोलीस स्टेशन चे सर्व पदाधिकारी आदिंनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन फैजपुर पुलिस स्टेशन ने केले होते.









