आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही…; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल.

 आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. शिवाय गावात बेइज्जत करतो अशी धमकी देखील दिली. याच भीतीपोटी एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नांदेड शहरालगत असलेल्या सुगांव येथे घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मुलीसह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन प्रभू शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन शिंदे या तरुणाचे थुगांव येथील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. तीन ते चारवर्षा पूर्वी दहावीत शिकत असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एक वर्षापूर्वी मुलीच्या घरच्यांना त्यांच्या या प्रेम प्रकरणाबाबत माहिती झाली. यावेळी दोघांची घरच्यांनी समजूत काढली होती.सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या चुलत भावाने मुलीला फोनवर का बोलतो, असे म्हणत नितीन याला मारहाण केली होती. त्यानंतर 18 मार्च रोजी तो कामावरून घरी परतत असताना मुलीच्या घरच्या लोकांनी त्याला पुन्हा मारहाण केली.

आम्ही देशमुख आहोत, तुम्ही पाटील आहात, तुमची औकात नाही, रस्त्यावर आणून बेईज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी देखील त्याला देण्यात आली. या भीतीपोटी नितीन शिंदे या तरुणाने गुरुवारी राहत्या घरी सिलिंगला दोरी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रभू शिंदे यांच्या तक्रारीवरून ज्ञानदेव भोसले, संतोष भोसले, विक्रम भोसले, अर्जुन भोसले, नितीन भोसले, संतोष भोसले यांच्यासह मुलीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम प्रकरणातून मुलाने आत्महत्या केल्याने मध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.