स्वच्छता कर्मचाऱ्याला मद्यपीने ‘हॅपी होली’ म्हणत पेट्रोल टाकून पेटवलं;

ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून  स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याने मद्यपीला हटकल्याने अंगावर पेट्रोल टाकून ‘हॅपी होली’ म्हणून कर्मचाऱ्याला पेटवून दिले. बसस्थानकाच्या आवारात पुन्हा येऊ नको, असे मद्यपीला बजवल्यानं त्याने कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती समोर येत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याला पेटवणाऱ्या शुभम जगतापला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. तर स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हा सुमारे 60 टक्के भाजल्याचे माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या  ठक्कर बाजार बस स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात विजय गेहलोत सफाईचे काम करत होता. यावेळी आरोपी शुभम जगताप त्या ठिकाणी आला. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्याने मद्यपी शुभमला हटकले. या ठिकाणी पुन्हा येऊ नकोस, असे स्वच्छता कर्मचाऱ्याने मद्यपी शुभमला सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग अनावर झाल्याने शुभमने विजयच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच विजयला “हॅपी होली” म्हणून शुभेच्छा दिल्या आणि आग लावली. या आगीत विजय होरपळला. तेथील काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर विजयला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या आगीत विजय 60 टक्के भाजला गेल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी आरोपी शुभम जगतापला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दहावीची लेखी परीक्षा अवघड गेल्याने तणावात असलेल्या 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रिफा फातेमा नवाज कुरैशी असे मृत मुलीचे नाव असून ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास वडाळा रोडवरील काजीनगर परिसरातील अजनूर सोसायटीत घडली. याबाबत  पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिफा हिने नुकतीच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची लेखी व तोंडी परीक्षा दिली होती. परंतु ही लेखी परीक्षा कठीण गेल्याने ती तणावात होती. पेपर अवघड गेल्याची बाब तिने कुटुंबासही सांगितली होती. दरम्यान, रमजान महिना सुरू असल्याने तिचे आई-वडील सोमवारी दुपारी खरेदीसाठीआले होते. त्यावेळी घरी कुणीही नसल्याची संधी साधून रिफाने परीक्षेच्या तणावातून किंवा अन्य कारणातून घरातील बेडरुममध्ये गळफास लावून घेतला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.