नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, उपचार सुरू असताना झाला मृत्यू.

 नागपुरात मोठा हिंसाचार उफाळला. या हिंसाचारामध्ये पोलिसांना टार्गेट करण्यात आले. नागपूरमधील जनजीवन अजूनही पूर्व पथकावर आले नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आज घेणार असून ते नागपूरच्या दाैऱ्यावर आहेत.औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलेले असताना सोमवारी नागपूरमध्ये मोठ्या हिंसाचाराची घटना घडली. यावेळी दगडफेक करून पेट्रोल बॉम्ब देखील फेकण्यात आली. रस्त्यावरील गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. या हिंसाचाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाली. नागपूरमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली. या हिंसाचारामध्ये पोलिसांना टार्गेट करण्यात आले. अनेक पोलिस अधिकारी हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.हेच नाही तर नागपूर हिंसाचारामध्ये महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांच्यासोबत चुकीचे वर्तन करण्यात आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दाैऱ्यावर आहेत.

यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती घेतील आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा देखील. यादरम्यानच मोठी माहिती ही आता पुढे येताना दिसतंय.नागपूर हिंसाचार प्रकरणाचा आता पहिला बळी गेलाय. नागपूर हिंसाचारातील एकाचा मृत्यू झालाय. हिंसाचारानंतर तो जखमी झाला होता, त्याच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यानच आता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतंय. जखमी इरफान अंसारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नागपुरातील मेयो रूग्णालयात जखमीवर उपचार सुरू होते. आता या हिंसाचार प्रकरणी पहिला बळी गेला आहे, यामुळे मोठी खळबळ उडालीये. हिंसाचारानंतर अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळतंयनागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून अजून दोघांना अटक करण्यात आलीये. नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधाराने जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोप सर्व खोटे असल्याने जामिन द्यावा, असे त्याच्या अर्जात नमूद करण्यात आलंय. नागपूर हिंसाचारानंतर आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगताना दिसत आहे. हिंसाचारामध्ये अनेकांच्या हातामध्ये तलवारी देखील व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसत आहेत. गाड्यांची मोठी तोडफोड या हिंसाचारामध्ये करण्यात आली. या हिंसाचारामध्ये पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावरही सध्या उपचार हे सुरू आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.