फहीम खानभोवतीचा फास आवळणार, कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी; सोशल मीडियाद्वारे हिंसा भडकवल्याचा ठपका.

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनी १७ मार्च रोजी अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.नागपूरमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनी १७ मार्च रोजी अटक केली होती. १८ मार्चला त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, ज्यानंतर न्यायालयाने त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र कोठडीत असतानाच फहीम खानने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान, पोलिसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर फहीम खान ऑनलाइन पद्धतीने कोर्टासमोर हजर झाला होता.

कोर्टाने त्याला आज न्यायालयीन कोठडी सुनावली आली आहे. तरी पोलीस कोठडी संदर्भातील मागणीचा निर्णय अजूनही खुला ठेवला आहे.फहीम खानवर यापूर्वीही सायबर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि भडकाऊ पोस्ट शेअर करून नागपूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. विशेषतः, पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचे समर्थन करणाऱ्या पोस्ट्स त्याने व्हायरल केल्या होत्या.या हिंसाचारात सहभागी असलेल्या सहा जणांवर देशद्रोहाचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

या आरोपींनी सोशल मीडियावर ‘अल्लाहू अकबर’ आणि ‘सर तन से जुदा’ यासारख्या भडकाऊ कॅप्शनसह पोस्ट्स शेअर केल्या होत्या, ज्यामुळे समाजात तणाव निर्माण झाला होता.नागपूर सायबर पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर हिंसा भडकवणाऱ्या पोस्ट्सवर कठोर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ५० टक्के आक्षेपार्ह पोस्ट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. लवकरच उर्वरित पोस्ट्सवरही नियंत्रण आणले जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलीस आणखी आरोपींचा शोध घेत आहेत. नागपूरमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून प्रशासनाकडून सुरक्षेचे उपाय कडक करण्यात आले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.