विजांच्या कडकडाटासह पाऊस, राज्यात अवकाळीसह गारपीट होणार, हवामान खात्याचा मोठा इशारा.

 राज्यातील तापमानाचं सतत बदल होत असून, अवकाळी पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. चंद्रपूर, लातूरमध्ये पाऊसही झाला. मुंबई, पुणे, कोकणात हवामान सामान्य राहील. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मागच्या आठ दिवसांपूर्वी राज्यात उष्णतेने अंगाची लाहीलाही होत होती तर आता वातावरण थंड जाणू लागतंय. हेच नाही तर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. दोन दिवस राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा आहे. चंद्रपूर आणि लातूरमध्ये तर पावसाने झोडपले आहे. पुढील दोन दिवस कुठेही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नाहीये. चंद्रपूरमध्ये सतत उष्णता वाढताना दिसत होती. आता मोठा दिलासा उष्णतेपासून मिळालाय.विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आलाय.

मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह लातूरमध्येही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. या अवकाळी पावसामुळे जरी वातावरण थंड होईल. मात्र, पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाल्याचेही बघायला मिळाले.दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबई, पुणे, कोकण, सोलापूरमध्ये सामान्य वातावरण राहिल.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा कोणताही फटका याठिकाणी बसणार नाही. मार्च महिन्यात दोन ते तीन वेळा हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा हा देण्यात आला होता. कोकणात उष्णता वाढताना दिसत होती.२५ मार्चपर्यंत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीये. नाशिक आणि खानदेशला देखील अवकाळीचा फटका बसणार नाहीये. बंगालच्या उपसागरातील ९०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात १५०० मीटर उंचीपर्यंतच्या आवर्ती चक्रीय वारे वाहत आहे. यामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल झाल्याचे चित्र बघायला मिळतंय. मार्च महिन्यातच काही शहरांमध्ये ४० अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र, त्यानंतर आता तापमानात मोठी घट झालीये.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.