‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत, मुलाला घेऊन गेला, अन्… पुणे हादरलं.

आरोपी माधव आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा कंपनीत कामाला होता; पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते.चारित्र्याच्या संशयावरून सतत पत्नीशी होणाऱ्या भांडणातून उच्चशिक्षित पतीने पोटच्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केला. ही धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.हिंमत माधव टीकेटी (वय ३ वर्ष ४ महिने, रा. तुकारामनगर, चंदननगर) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील माधव साधुराव टीकेटी (वय ३६) याला अटक केली आहे. मुलाची आई स्वरूपा यांनी फिर्याद दिली आहे.चंदननगर परिसरात टीकेटी कुटुंबीय राहण्यास आहे. आरोपी माधव आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा कंपनीत कामाला होता; पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होते; तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता.

गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजामुळे हिंमत झोपेतून उठला. दुपारी साडेबारा वाजता माधव घरातून बाहेर पडत असताना हिंमत त्याच्या मागे लागला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातुन धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला.मुलाला तिथेच टाकून तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजूनही पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. भरपूर दारू प्यायल्याने त्याला मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. शुक्रवारी पुन्हा आरोपीकडे कसून तपास केल्यावर मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली .पती माधव सतत भांडणे करीत असल्याने पत्नी स्वरूपा दोन्ही मुलांना घेऊन माहेरी विशाखापट्टणमला गावी गेली होती; पण आठ वर्षांच्या मुलीची परीक्षा सुरू झाल्याने पत्नी दोन्ही मुलांना घेऊन पुण्यात आली होती. मात्र, पती सतत चारित्र्याचा संशय घेऊन हिंमत आपला मुलगा नसल्याचे सांगत होता. याचा राग त्याच्या डोक्यात होता. त्या रागातून त्याने मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.