माझ्या नवऱ्याला गोवले जातंय, जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नीचा मोठा दावा, म्हणाल्या, बसमध्ये त्यांचे सख्खे भाऊजी असताना ते…

 हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच ही आग लावल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी हंबर्डीकरला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले की, चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच ही आग लावली.हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला मोठी आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. धक्कादायक म्हणजे ही आग बसच्या चालकानेच लावल्याचा खुलासा झालाय. ट्रॅव्हल्सचा चालक जनार्दन हंबर्डीकरनेच हा सर्व आगीचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. हैराण करणारे म्हणजे याच ट्रॅव्हल्स बसमध्ये हंबर्डीकर यांचे भाऊजी देखील प्रवास करत होते, यामुळे आता विविध चर्चांना उधाण झाले. जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नीने मोठा दावा केला आहे.या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतानाच आता हंबर्डीकरांच्या कुटुंबियांकडून वेगळाच दावा केला जात आहे. जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना माझ्या पतीला गोवले जात असल्याचे म्हटले.

जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नी नेहा हंबर्डीकर यांनी म्हटले की, कोणी आपल्या बहिणीच्या पतीचा जीव धोक्यात घालेल का? ज्या बसला आग लागली आहे, त्या बसमध्ये त्यांचे भाऊजी होते. काही जण या घटनेनंतर सुखरूप बाहेर पडले, त्यांच्या अंगावर साधी जखम नसल्याचा दावा नेहा हंबर्डीकर यांनी केला.पेटत्या बसमधून हे लोक बाहेर कसे आले?. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांच्याकडे पैसेच नसते तर त्यांनी मला पैसे कसे दिसले असते. जे काही सर्व सांगितले जात आहे ते खोटे आहे. या प्रकरणाचा योग्य तपास व्हायला पाहिजे, असेही नेहा हंबर्डीकर यांनी म्हटले आहे.

दिवाळीला जनार्दन हंबर्डीकर यांचा पगार कापल्या गेल्याचाही दावा खोटा असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.या आगीच्या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वात अगोदर बसमधून चालक जनार्दन हंबर्डीकर उतरताना दिसतोय. त्यानंतर पाठोपाठ अजून काही लोकांनी बसमधून उड्या मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. आरोपी जनार्दन हंबर्डीकर याने बसमध्ये आग का लावली? याबद्दल खुलासा केलाय. त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि सर्व प्रकार उघडकीस झाला. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.