कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरुन गदारोळ; भाजपचे १८ आमदार ६ महिन्यांसाठी निलंबित.

 विधानसभा अध्यक्षांचा अवमान केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या १८ आमदारांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. या गोंधळी आमदारांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढण्यात आले.राज्य सरकारी कंत्राटांमध्ये चार टक्के कंत्राट मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयावरून कर्नाटक विधानसभेत शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गदारोळ केला. त्यातून विधानसभा अध्यक्षांचा अवमान केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या १८ आमदारांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. या गोंधळी आमदारांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस शुक्रवारी होता. कामकाज सुरू होतानाच भाजप आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. काही आमदार विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादेर यांच्या आसनासमोरील पोडियमवर चढले आणि त्यांनी अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावले. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री एच. के. पाटील यांनी गोंधळी सदस्यांना निलंबित करण्याचा ठराव मांडला. तो स्वीकारण्यात आला.

शुक्रवारी निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे मुख्य प्रतोद दोड्डण्ण गौडा पाटील, सी. एन. अश्वत नारायण, बी. ए. बसवराजू, एम. आर. पाटील, शरणू सलगर, यशपाल सुवर्णा, बी. पी. हरीश, भारत शेट्टी, मुनिरत्न आणि बसवराज मट्टीमूद यांचा समावेश आहे. निलंबिनानंतरही भाजप आमदारांनी सभागृह सोडण्यास नकार दिल्याने त्यांना मार्शलकरवी बाहेर काढण्यात आले.तत्पूर्वी, सरकार विरोधी आमदारांना ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करून भाजप आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील हौद्यात उतरून (वेल) तिथे घोषणा दिल्या.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही भाजप आमदारांनी केली. मुख्यमंत्री या वेळी भाषण करीत होते.आमदारांच्या निलंबनाचा आदेश वाचून दाखवताना अध्यक्ष खादेर म्हणाले, ‘आजची घटना अत्यंत दु:खद होती. त्या घटनेमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. हे केवळ अध्यक्षांचे आसन नाही. हे लोकशाही, सत्य आणि न्याय यांचे प्रतीक आहे. या आसनावरून बोलणे अभिमानास्पद असते. प्रत्येक सदस्याने या आसनाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य यांचा मान राखलाच पाहिजे. आपल्यापैकी कोणीही या आसनापेक्षा मोठा नाही. आपल्या व्यक्तिगत भावभावना आसनाच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठ्या असता कामा नयेत.’

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.