बीडच्या खोक्यानंतर सोलापुरात नाईन्ट्या, पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकून केली मारहाण.

सोलापूरमध्ये नाईन्ट्या ऊर्फ ओंकार नलावडे याचा धक्कादायक कारनामा पुढे आलाय. त्याने पोलिसांवर हात उचलत मारहाण केली आणि पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. हेच नाही तर तो पोलिस हवालदाराच्या अंगावर थुंकला देखील. नाईन्ट्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला. यादरम्यान बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. हेच नाही तर बीडच्या आकानंतर खोक्याचेही व्हिडीओ व्हायरल झाली. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याचे मारहाणीचे व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. खोक्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले. बीडमधील अनेक आका, खोक्या पुढे आल्यानंतर आता सोलापूरातील नाईन्ट्याचे कारनामे पुढे आले.

सोलापूरच्या रामलाल चाैकात प्रजा मटन स्टॉलजवळ काही लोक गोंधळ घालत होते. यावेळी नाईन्ट्या ऊर्फ ओंकार नलावडे हा स्वत: हून फुटपाथवर डोके आणि तोंड आदळून घेत होता. यावेळी त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता आणि रक्तस्त्रावही होत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस हवालदार दिनेश घंटे हे नाईन्ट्याला घेऊन जात होते. यावेळी त्याने पोलिस हवालदाराच्या अंगावर थुंकत मारहाण केली.हेच नाही तर दिनेश घंटे यांचे शर्ट पकडून तो मारत होता. पोलिस ठाण्यात नेल्यानंतरही परत एकदा दिनेश घंटे यांच्या अंगावर थुंकून त्यांना नाईन्ट्याने मारहाण केली.

यावेळी मोठा गोंधळ झाला. नाईन्ट्याला शांत राहण्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले असता नाईन्ट्याने त्यांना देखील मारहाण केली. अरविंद माने यांच्या छातीत त्याने बुक्की मारली. तो पोलिस ठाण्यात गोंधळ घालत होता. या प्रकारानंतर नाईन्ट्याच्या विरोधात फाैजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.हेच नाही तर महिलेची छेडछाड आणि तिच्या मुलाला आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणीही नाईन्ट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी नाईन्ट्याला सुनावली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. बीडच्या खोक्याची चर्चा असतानाच सोलापूरचा हा नाईन्ट्या चर्चेत आहे. त्याची दादागिरी इतकी जास्त वाढली की, त्याने थेट पोलिसांवर हात उचलला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.