वकिलांचा ‘स्पेशल २६’! मुंबईतील व्यापाऱ्याची साडेअकरा लाखांची फसवणूक, ४ तोतया अधिकाऱ्यांना अटक.

‘स्पेशल २६’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे लूट करणाऱ्या चार तोतया अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. धक्कादायक म्हणजे या चार तोतया अधिकाऱ्यांमध्ये दोन वकील आहेत.भायखळा येथील सोनेव्यापाऱ्याच्या दुकानात चार अधिकाऱ्यांनी छापा टाकला. इंटेलिजन्स युनिटचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी सोनेतस्करीचा ठपका ठेवत दुकानाची झाडाझडती घेतली. यातील एकाने लॅपटॉपमध्ये नोंदी घेतल्या आणि त्यानंतर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. २५ लाख खंडणीची मागणी करीत साडेअकरा लाख रुपये उकळले. ‘स्पेशल २६’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे लूट करणाऱ्या चार तोतया अधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. धक्कादायक म्हणजे या चार तोतया अधिकाऱ्यांमध्ये दोन वकील आहेत.भायखळा येथे वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याचे बालाजी गोल्ड नावाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. हे व्यापारी बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या दोन कर्मचाऱ्यांसह बसले असताना चार जण कार्यालयात शिरले. इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी असल्याचे ओळखपत्र चौघांनी दाखवले.

कुणीही दुकानातून बाहेर पडू नका, असे बजावत आपण रोख रकमेत सोने विक्री करीत असून सोन्याची तस्करी करता, अशी माहिती आहे, असे सांगून चौघांनी दुकान आणि कार्यालयाची झडती घेतली. चौघांमधील एकाने आपल्या बॅगेतून आणलेले लॅपटॉप काढून त्यामध्ये दुकानातील वस्तूंच्या नोंदी घेतल्या.तुला आमच्यासोबत यावे लागेल, असे सांगून त्यांनी व्यापाऱ्याला सोबत घेतले. गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी २५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. इतकी रक्कम नसल्याचे व्यापाऱ्याने सांगताच तडजोडीअंती साडेअकरा लाख देण्याचे ठरले. व्यापाऱ्याला घेऊन चौघांनी गिरगाव गाठले. व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्याला ही रक्कम घेऊन येण्यास सांगितले.

कर्मचाऱ्याने दिलेली रक्कम दिल्यावर चौघांनी व्यापाऱ्याला टॅक्सीतून विनय हॉटेलसमोर सोडले आणि पोबारा केला.छापा टाकणारे अधिकारी बोगस असल्याचा संशय आल्याने व्यापाऱ्याने व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तपास कौशल्य पणाला लावून प्रथम आझाद मैदान परिसरातून किसन शेलार याला अटक केली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पवन चौधरी, सूर्यकांत शिंदे आणि श्रीजीत गायकवाड यांना पकडण्यात आले. यामध्ये सूर्यकांत आणि श्रीजीत हे दोघे वकील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तोतया अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत – व्यापाऱ्याकडे २५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती साडेअकरा लाख देण्याचे ठरले. त्यानुसार ही रक्कम मिळताच व्यापाऱ्याची सुटका करीत आरोपींनी पोबारा केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.