एसीबीची कारवाई : दीड हजारांची लाच घेताना अधिकारी अटकेत !

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाच घेण्याची पद्धत आज देखील सुरु असतांना नुकतेच कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजार रूपयांची लाच स्विकारतांना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने कार्यालयात रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता केली आहे. प्रविण चौधरी असे अटक केलेल्या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तक्रारदार यांना वर्क ऑर्डर देण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रविण चौधरी यांनी दीड हजारांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदार यांनी यासंदर्भात जळगाव लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणीसाठी पथकाने शुक्रवारी दुपारी धरणगाव पंचायत समिती कार्यालयातच सापळा रचला.

यावेळी प्रविण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दीड हजार रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.