तलाठ्याला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न वाळूमाफियांची मुजोरी वाढली

तलाठ्याला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न वाळूमाफियांची मुजोरी वाढली

एरंडोल तालुक्यातील खेडी फाट्यानजीकची घटना

जळगाव । एरंडोल तालुक्यातील रवंजा गावात महसूल पथक कारवाई करत असताना ट्रॅक्टर मालकाने कढोलीचे तलाठी नितीन पाटील यांच्यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ते जखमी झाले. ही घटना घडताच ट्रॅक्टर मालक राजू कोळी फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेदरम्यान, जप्त केलेले ट्रॅक्टर नेत असताना स्टेअरिंग लॉक झाल्याने ते पुलावरून खाली कोसळले. जेसीबी आणि क्रेनच्या माध्यमातून ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण, रवंजा या भागात गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. याबाबतची माहिती मंडळ अधिकारी संजय साळुंखे यांनी तलाठी नितीन पाटील यांना देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास तलाठी नितीन पाटील हे पथकासहकारवाईसाठी जात असतांना रवंजा गावाजवळ खेडी फाट्याजवळील रस्त्यावरून एक ट्रॅक्टर कांताई बंधाराकडून येतांना दिसले. त्यास थांबविले असता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत एक ब्रास वाळू साठा आढळून आला. ट्रॅक्टर चालकाला परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना नसल्याने ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. यावेळी त्याठिकाणी राजू रामचंद्र नन्नवरे हा त्याठिकाणी आला व त्याने ट्रॅक्टर चालकास उतरवून ते ट्रॅक्टर पळवून नेत होता.

यावेळी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने ट्रॅक्टरने नितीन पाटील यांची दुचाकी क्र. एमएच ५४ – ५५४२ हिला मागून धडक मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या धडकेत तलाठी नितीन पाटील हे जखमी झाले असून राजू नन्नवरे हा घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान या प्रकरणी तलाठी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसात शासकीय कामात अडथळा आणणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.