जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन .

 22 मार्च रोजी राष्ट्रीय जल दिन जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन जळगाव : २२ मार्च, जागतिक जल दिन! या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते म्हणाले, “पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान आहे. मात्र, हे वरदान आपण जपले नाही तर भविष्यात भीषण संकट उभे राहू शकते.

म्हणूनच जलसंधारण, पाणी पुनर्वापर, टाकाऊ जल व्यवस्थापन, जलसाक्षरता आणि जबाबदारीने पाण्याचा वापर या मुद्द्यांकडे सर्व नागरिकांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.” महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला आजही काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत.

जलजीवन मिशन, हर घर जल योजना, ग्रामीण भागातील शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांमधून नागरिकांना पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे.
“पाणी ही फक्त निसर्गाची देणगी नाही, ती आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक जबाबदारी आहे.” असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला जलसंधारणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या तत्त्वावर चालत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.