अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जळगावमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम.

अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जळगावमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम.  23 मार्च रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात नृत्य-नाट्य, संगीत व दृकश्राव्य सादरीकरण; सर्वांसाठी मोफत प्रवेश जळगाव : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जळगाव येथे 23 मार्च रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. परिवर्तन जळगाव संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून, नृत्य, नाट्य, संगीत आणि दृकश्राव्य माध्यमातून अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेतला जाणार आहे. 50 हून अधिक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार असून, नाट्यदिग्दर्शन हनुमान सुरवसे, संगीत दिग्दर्शन शरद भालेराव, नृत्यदिग्दर्शन नाना सोनवणे, तर संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन हर्षल पाटील यांचे आहे, तर या कार्यक्रमाचे निर्मिती प्रमुख शंभू पाटील व नारायण बाविस्कर हे आहेत.

अहिल्याबाई होळकर या मराठा इतिहासातील कर्तबगार राज्यकर्त्या होत्या. अकाली वैधव्य आले तरी त्यांनी न डगमगता राज्यकारभार सांभाळला आणि लोककल्याणासाठी भव्य कार्य केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे त्यांचा जीवनप्रवास रसिकांसमोर उलगडला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे , खा.स्मिताताई वाघ, आ.एकनाथ खडसे, आ.किशोर दराडे, आ.सत्यजित तांबे, आ. सुरेश भोळे , आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ.अनिल पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ.अमोल पाटील,आ. अमोल जावळे या सोबतच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी मीनल करनावल, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर सचिव विकास खारगे आणि संचालक बिभीषण चवरे यांनी सर्व रसिकांना या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.