थोरगव्हाण मेथे नाथषष्ठी निमित्त दत्त महाराज पादुका पूजन व रुद्राभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रम .संपन्न भुसावळ प्रतिनिधी – युवराज कुरकुरे रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे २० मार्च २०२५ रोजी माधवनाथ महाराज मंदिरात नाथ षष्ठीच्या निमित्ताने दत्त महाराजांच्या पादुकांचे पूजन व रुद्राभिषेक संपन्न झाले. डोंबिवलीस्थित नाथ शिष्य चंद्रकांत जनार्दन पाटील व मनीषा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा अभिषेक सपत्नीक करण्यात आला.
परिसरातील रावेर, जळगाव, भुसावळ व थोरगव्हाण येथील अनेक नाथशिष्य आणि भाविक मोठ्या उत्साहात दर्शनासाठी उपस्थित होते. या पावन सोहळ्यानिमित्त इंदूरस्थित नाथशिष्य रोहित अशोक कोल्हे व सौ. प्रचिती रोहित कोल्हे यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
माधवनाथ सेवा संघ, थोरगव्हाण यांच्या वतीने सर्व भक्तांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नाथभक्त उमाकांत लोणे यांनी केले. यावेळी माधवनाथ सेवा संघाचे सचिव वामन लक्ष्मण चौधरी, प्रशांत चौधरी, निलेश चौधरी व पंढरीनाथ तेजनकर उपस्थित होते.पूजन व धार्मिक विधी पौरहित्य उदय दीक्षित व त्यांच्या सहकारी मंडळाने पार पाडले.









