चार जणांचा होरपळून मृत्यूला कारणीभूत ठरलेलं बेंझिन केमिकल किती घातक? निष्काळजीपणासाठी व्युमो ग्राफिक्सवर गुन्हा दाखल

टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून उरलेलं बेंझिन केमिकल कुठं आहे? बेंझिन केमिकल किती घातक आहे? निष्काळजीपणा प्रकरणी व्युमो ग्राफिक्सवर गुन्हा दाखल होणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहे.हिंजवडीत आयटी हबमधील टेम्पो  ट्रॅव्हल्सच्या जळीत कांडाने धक्कादायक वळण घेतलं आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं आणि हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र, ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे. दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती, म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. या प्रकरणाने नेमकं वेगळं घेतलं आहे, या चालकाने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस चौकशीमध्ये त्याने सर्व माहिती दिली आहे. दरम्यान टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून उरलेलं बेंझिन केमिकल कुठं आहे? बेंझिन केमिकल किती घातक आहे? निष्काळजीपणा प्रकरणी व्युमो ग्राफिक्सवर गुन्हा दाखल होणार का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहे.

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी चालकाने एक लिटर बेंझिम केमिकलचा वापर केला होता. मात्र आणखी चार लिटर बेंझिन केमिकल व्युमो ग्राफिक्स कंपनीतून चोरीला गेल्याचं आणि ते चालक जनार्दन हंबर्डीकरकडे असल्याचं बोललं जातं आहे. मग उरलेल्या बेंझिन केमिकल कुठं आहे आणि याचा वापर कशासाठी करणार होता का? याचा तपास पोलीस करणार आहेत. बेंझिन केमिकल बाजारात सामान्य व्यक्तींना उपलब्ध होत नाही. याची कल्पना असताना व्युमो ग्राफिक्स कंपनीने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्टपणे समोर आलं आहे. त्यामुळं कंपनीवर गुन्हा दाखल होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणी हिंजवडीचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात बेंझिन केमिकल हे ज्वालाग्रही आहे अशी माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार कंपनीमध्ये साफसफाई करण्यासाठी या केमिकलचा वापर केला जातो. ही भीषण आग पहिल्यानंतर कळेलच की हे किती घातक आहे. आगीच्या संपर्कात आल्यानंतर उडालेला भडका त्यामुळे घडलेली ही घटना यामुळे लक्षात येते की हे किती ज्वालाग्रही  आहे.काहीच कंपन्यांमध्ये या केमिकलचा वापर केला जातो. याचा तपास सुरू आहे, अशी माहिती यावेळी कन्हैया थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

हिंजवडीत पेटलेली टेम्पो ट्रॅव्हल्स व्युमो ग्राफिक्स कंपनीची होती, याच कंपनीतून बेंझिन केमिकल चोरून चालक जनार्दन हंबर्डीकर ने गाडी पेटवली. कंपनीतून नेमकं एक लिटर बेंझिन चोरीला गेलं की पाच लिटर याचा तपास सुरुये. टेम्पो ट्रॅव्हल्स पेटविण्यासाठी एक लिटर बेंझिनचे वापरले तर मग उरलेलं बेंझिन कुठं आहे, अन त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? याचा तपास पोलीस करतायेत. सोबतचं किती पगार थकला, याची कागदपत्रे ही ताब्यात घेतली जाणार आहेत.हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्धन हंबर्डेकर याने चौकशीमध्ये त्याला कोणत्या गोष्टींचा राग आला होता ते सांगितलं आहे. कंपनीतील काही कर्मचारी-अधिकारी यांच्याकडून मिळणारी वागणूक आणि त्यामुळे चालकाच्या मनात राग आणि चीड निर्माण झाली होती. कंपनी व्यवस्थापनाने चालकाता दिवाळीत पगार कापला होता. त्याचबरोबर चालक असून देखील त्याला अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती, व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती, असं त्याचं म्हणणं होतं. तर मागच्या आठवड्यामध्ये त्याला जेवणाचा डबा देखील खाऊ दिला नव्हता. या कारणांमुळे चालक जनार्धन हंबर्डेकर याचा कंपनीतील तिघांवर राग होता. त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने कट रचला होता. परंतु या घटनेत नाहक ज्या चार जणांचा बळी गेला, त्यांच्यावर चालकाच रागच नव्हताच. ज्यांच्यावर राग होता ते या घटनेमध्ये बचावले आहेत. चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.