मेरठ हत्या प्रकरणात झालीये काळी जादू? आरोपीच्या खोलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच्या खोलीमध्ये सैतानाची आणि काही मंत्र सापडले. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील व्हाल शॉक्डमेरठ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरल आहे. बायकोनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केली. आणि मग त्याच्या शरीराचे १५ तुकडे करून ते ड्रममध्ये भरले. आणि मग सिमेंटने त्या ड्रमला पॅकिंग केली. बरं, ती एवढ्यावर थांबली नाही तर त्या नंतर ती आपल्या प्रियकरासोबत शिमला या ठिकाणी फिरयला गेली. पण परत आल्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.लक्षवेधी बाब म्हणजे वरकरणी हे प्रकरण फार साधं सोपं वाटतेय. पण आता हत्या प्रकरणात काळा जादू सामिल असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. अन् या चर्चेमागे कारण ठरलेय ते आरोपी साहिलची रहस्यय खोली.
होय, तो ज्या खोलीत राहात होता त्यामध्ये अशा चित्रविचित्र गोष्टी सापडल्या की ज्या पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल. या खोलीचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. चला तर मग पाहूया तो व्हायरल होत असलेला व्हिडीओ.ही भयानक घटना उत्तरप्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरानगर मास्टर कॉलनीमध्ये घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचं नाव सौरभ कुमार असं आहे.
नुकताच तो लंडनहून परत आला होता. पण घरी येताच बायको मुस्कान रस्तोगी हिने प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून त्याची हत्या केली.पण या हत्येमागे काळा जादू प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. अन् त्याच पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.









