इतरांना मदत करणारा ‘आपदा मित्र’ म्हणून लोकप्रिय, बसच्या चाकाखाली आला आणि आक्रीत घडलं.

मुंबई-गोवा महामार्गावर बसच्या चाकाखाली येत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर आजवर अनेकदा अपघात घडले आहेत. अनेकांचे संसार याच महामार्गावरील झालेल्या अपघातामुळे उध्वस्त झाले आहेत. मुंबई – गोवा हायवेवर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. अपूर्ण असलेला हा महामार्ग अनेकांचे संसार उध्दवस्त करणारा मृत्यूचा सापळा बनला आहे. याच महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर जुने माणगाव येथील तीन बत्ती नाका येथे २० मार्च रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या दरम्यान प्राणांतिक अपघात घडला आहे.महाड बाजूकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर क्र. RJ १९ GG ०५७० याने भरधाव वेगात येत मागच्या टायरखाली एका दुचाकीस्वाराला चिरडले. या दुर्दैवी अपघातात माणगाव येथे राहणारा रफीक जामदार (वय वर्षे ३९) याचा मृत्यू झाला आहे.

रफिक आपली हिरो होंडा पॅशन प्लस क्रं एम एच ०६ वाय ४४८२ घेऊन जात असताना तीन बत्ती नाका येथे कंटेनरच्या मागील टायरखाली येऊन चिरडला गेला आणि रफिक जामदार याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रफिक जामदार हा व्यवसायाने इलेक्ट्रिशन, प्लबिंग, एसी-फ्रीज मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. तसंच रफिक जामदार हा ‘आपदा मित्र’ म्हणून माणगांवमधील साळुंखे रेस्क्यू टीममध्येही कार्यरत होता. रफिक हा अजातशत्रू म्हणून परिसरात परिचित होता. अनेकांच्या अडचणींना तो स्वतःहून धावून जात असे.

मात्र रेस्क्यू टीममधून आपल्या प्राणांची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवणारा रफिकचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. रफिकच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.दरम्यान, माणगावमध्ये सततची वाहतूक कोंडी, वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे हा अपघात होऊन रफिकचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि रफिकचे नातेवाईक रस्त्यावर उतरले होते. मात्र घटनास्थळी माणगाव पोलीस ठाणे टीम, माणगाव वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस यांच्या मदतीने प्रकरण शांत करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.