नागपूर हिंसाचार प्रकरणी ९१ जण अटकेत, अल्पवयीनांचा आकडा मोठा, पोलिस आयुक्तांची माहिती.

 नागपूरमधील हिसांचार प्रकरणात ९१ जणांना अटक करण्यात आली असून यात अल्पवयीन आरोपीही मोठ्या प्रमाणात असल्याची आल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ८० जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये ११ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.दंगलीनंतर नागपूर शहरातील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगर आणि नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतून संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे. तर लकडगंज, शांतीनगर, इमामवाडा आणि यशोधरानगर या भागांमध्ये दोन तासांसाठी संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये. मात्र, कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये अद्यापही संचारबंदी कायम आहे.

सोमवारी रात्री महाल परिसरातील गांधीगेट येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान, काही समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली, ज्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या हिंसाचारात तीन पोलीस उपायुक्तांसह ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर पाच नागरिक जखमी झाले आहेत.या प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान सतत आपले ठिकाण बदलत असल्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून, त्याचा पूर्वेतिहास तपासला जात आहे. पोलिस आयुक्तांनी या तपासादरम्यान काही विशिष्ट गोष्टींचा संशय व्यक्त केला आहे, ज्यावर सखोल तपास सुरू आहे.शहरातील तणावपूर्ण शांतता कायम असून, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. संचारबंदी लागू असलेल्या भागांमध्ये नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.