दोघांमधील वाद टोकाला गेला, पतीचं भयंकर कृत्य; पत्नीला थेट… साताऱ्यातील घटनेने खळबळ.

साताऱ्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. खटाव तालुक्यातील कलेढोण येथील मंगल संतोष जाधव या महिलेचा तिच्या पतीने संतोष सखाराम जाधव यांने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कृत्य चारित्र्याच्या संशयावरून घडलं असून पोलिसांनी संतोष जाधव यास ताब्यात घेतलं आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सखाराम जाधव (मूळगाव नरसिंगपूर, ता. वाळवा) येथील असून सध्या तो आपली पत्नी सुमन उर्फ मंगल संतोष जाधव हिच्यासह सासरवाडी कलेढोण येथे बेघर वसाहतीत वास्तव्यास आहे. तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.संतोष हा नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे वारंवार त्यांच्यात खटके उडत होते.

दोघांमध्ये मंगलचा भाऊ प्रशांत माने आणि त्याची पत्नी उषा हे नेहमीच या दोघांना समजावून सांगून त्यांचं भांडण मिटवत होते. परंतु बुधवार रात्री नऊच्या सुमारास संतोष आणि मंगल यांच्यात वादावादी सुरू होती. याच कारणावास्तव मंगलचा भाऊ आणि वहिनी उषा यांनी दोघांत समेट घडवून आणला होता. परंतु रागाच्या भरात संतोषने सुमन उर्फ मंगल हिचा गळा आवळून तिची हत्या करून तिथून पलायन केलं होतं.नेहमीप्रमाणे प्रशांत आणि त्याची पत्नी दोघेही पहाटे साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले असता मंगलच्या घराचा दरवाजा उघडा दिसला.

त्यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले, तर त्यावेळी त्यांना मंगल निपचित पडलेली दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता मंगल मृत झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी तात्काळ मायणी पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती दिली.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच पोलिसांनी संशयित आरोपी संतोषला इस्लामपूरमधून अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.