दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, जागीच मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो.

नागपुरात एका चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिचे लचके तोडून केलेल्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील गुमगाव भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला जागीच ठार केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ही घटना गुरुवारी दुपारी अंदाजे १.३० वाजता घडली. हर्षिता रामसिंग ही दोन वर्षांची मुलगी आपल्या आईसोबत गुमगाव नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी आली होती. आई कपडे धुत असताना हर्षिता खेळता खेळता पुलाखाली पोहोचली. काही वेळानंतर जेव्हा तिची आई तिला शोधू लागली, तेव्हा तिला पुलाखाली भयानक दृश्य पाहायला मिळाले. हर्षिता रक्ताने माखलेली होती आणि तिच्या आसपास मोकाट कुत्र्यांचा वावर होता. दरम्यान, रामसिंग आणि लक्ष्मी यांना तीन मुली व दोन मुले आहेत.

गेल्या सहा वर्षांपासून रामसिंग आणि लक्ष्मी आपल्या अपत्यांसह सासू रेखा रामटेके यांच्याकडे राहतात.घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासानुसार, मुलीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी हर्षिताला एम्समध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असून, लहान मुले आणि वयोवृद्धांना विशेष धोका निर्माण झाला आहे.नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्थानिकांनी कुत्र्यांचे निर्बंध आणि पुनर्वसन यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. सध्या हिंगणा पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.