छत्तीसगडमध्ये ३० माओवादी ठार; सुरक्षा दलांसोबत चकमकी, एक जवान हुतात्मा.

छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन चकमकींमध्ये ३० माओवादी ठार झाले. यामध्ये एक जवान हुतात्मा झाला आहे.छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन चकमकींमध्ये ३० माओवादी ठार झाले. यामध्ये एक जवान हुतात्मा झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.बिजापूर जिल्ह्यात २६ माओवादी ठार झाले. तर एक जवान हुतात्मा झाला. कांकेरमध्ये चार माओवादी मारले गेले. राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) संयुक्तपणे ही मोहीम राबवली. ‘गंगालूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने माओवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली. विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमावर्ती क्षेत्रातील जंगलात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. घटनास्थळावरून २६ माओवाद्यांचे मृतदेह हाती घेण्यात आले. स्फोटकेही जप्त करण्यात आली,’ असा तपशील बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिला.

‘डीआरजी’चा एक जवान या गोळीबारात हुतात्मा झाला, असेही त्यांनी सांगितले.दुसऱ्या घटनेत डीआरजी आणि बीएसएफचे संयुक्त पथक माओवाद्यांविरोधी मोहिमेवर असताना कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेजवळ असलेल्या जंगलात चकमक झाली. ‘कारवाईनंतर या घटनास्थळावरून चार माओवाद्यांचे मृतदेह हाती घेण्यात आले. तसेच स्वयंचलित शस्त्रेही हस्तगत करण्यात आली,’ अशी माहिती कांकेरच्या पोलिस अधीक्षक इंदिरा कल्याण इलेसेला यांनी दिली. चकमकीच्या दोन्ही ठिकाणांवर शोधमोहिमा सुरू आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत छत्तीसगडमध्ये विविध चकमकींत ११३ माओवादी मारले गेले.छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी पहाटे माओवाद्यांनी एका आयईडीचा स्फोट घडवून आणला.

यामध्ये सुरक्षा दलांचे एक पथक थोडक्यात बचावले, असे पोलिसांनी सांगितले. या स्फोटात सुरक्षा दलाच्या जवानांना गंभीर इजा झाली नाही. मात्र एका अधिकाऱ्यासह दोन पोलिसांच्या डोळ्यांत स्फोटामुळे उडालेली धूळ आणि माती गेल्याने त्यांना त्रास जाणवू लागला. यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यात आले. ही घटना अबुझमाड येथे गुरुवारी पहाटे ३ वाजता घडली. यावेळी डीआरजी आणि विशेष कृती दलाचे संयुक्त पथक माओवाद्यांविरोधातील मोहिमेवर होते. माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी या परिसरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू आहे.या मोहिमेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कौतुक केले. ‘माओवादमुक्त भारत मोहिमेच्या दिशेने हे मोठे यश आहे. नरेंद्र मोदी सरकार माओवाद्यांविरुद्ध निर्दयी दृष्टिकोन ठेवून पुढे जात आहे. सर्व सुविधा देऊ करूनही शरणागती न पत्करणाऱ्या माओवाद्यांविरुद्ध शून्य सहिष्णूता धोरण अवलंबले जात आहे. पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत देश माओवादमुक्त होईल,’ अशी पोस्ट शहा यांनी ‘एक्स’वर केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.