गोहत्येच्या गुन्हेगारांवर यापुढे मकोका कारवाई केली जाईल; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा.

गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळात मकोका कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याखाली (मकोका) कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.आमदार संग्राम जगताप यांनी श्रींगोदा तालुक्यातील ससाणेनगर येथे फटाके उडवण्यावरून झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. या परिसरात राहणाऱ्या कुरेशी आणि ससाणे कुटुंबामध्ये हाणामारी झाली होती. त्यामध्ये ससाणे कुटुंबातील एका व्यक्तीचा १५ दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. कुरेशी कुटुंब हे गो तस्करी करणारे कुटुंब असून त्यांची या परिसरात दहशत आहे. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा तत्काळ दाखल करून घेतला नाही.व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला, आरोपीला अटक झाली असली तरी लगेचच जामीन मिळाला आहे.

त्या व्यक्तीने जामीन मिळाल्यानंतर गो तस्करीचा गुन्हा केला आहे. या सर्व प्रकारात पोलिसांकडून दिरंगाई झाली असल्याचा दावा जगताप यांनी केला. तसेच, गो-तस्करीचे प्रकार वारंवार करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, श्रीगोंद्यातील घटनेमध्ये कोणीही तक्रार दिली नव्हती. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर १५ मिनिटांत तेथे पोहोचले होते. तसेच, जखमींना उपचारांसाठी दाखल केले होते. या घटनेत एका व्यक्तीचा १५ दिवसांनी खासगी रुग्णलायात मृत्यू झाला. त्यानुसार संबंधित आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांनी कुठलीही दिंरगाई केली नसल्याचा दावा गृह राज्यमंत्र्यांनी केला. त्या आरोपीवर विविध गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगताप यांच्या मागणीला उत्तर दिले. गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याखाली (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलिस दलाला दिले जातील, असे फडणवीस म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.