एक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली. खूप शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी लोकेशन शोधलं तेव्हा ती लोहगडावर गेल्याचं आढळलं. पण, ती परत येताना दिसली नाही. लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका झुडुपात बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकट खळबळ माजली आहे. तिने नैराश्यातून गडावरून उडी घेत आपली जीवन यात्री संपवल्याचं आता समोर आले आहे. गेल्या वर्षी तिचं अपेन्डीक्सचं ऑपरेशन झालं होतं. तसेच, आजारपणामुळे तनला एल. एल. बी. मधील तिसऱ्या वर्षाची परीक्षा देखील देता आली नव्हती, या कारणांवरून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आले आहे.










