आधी आठवलेंना सोडले, आता ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आंबेडकरी नेता अजितदादांसोबत.

आंबेडकरी चळवळीतील नेते अशोक गायकवाड यांनी ठाकरेंची शिवसेना सोडत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यामुळे पक्षाला अभ्यासू तसंच आक्रमक नेता मिळाला आहे.आंबेडकरी चळवळीतील आक्रमक मात्र अभ्यासू नेता म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक गायकवाड यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गायकवाड यांचा पक्षप्रवेश घडून आला. मुंबईत पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनीच गायकवाड यांचे पक्षात स्वागत केले. अशोक गायकवाड यांच्यामुळे पवार यांच्या पक्षाला आंबेडकरी चळवळीतील आक्रमक आणि अभ्यासू नेता मिळाला आहे.अशोक गायकवाड यांच्यासोबत प्रा.भीमराव पगारे, सुरेशराव गायकवाड, सुखदेव शिंदे, ल्युथर गायकवाड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी नगर शहराध्यक्ष संपत बारस्कर उपस्थित होते. गायकवाड यांच्यावर राज्यपातळीवरील जबाबदारी द्वावी, अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली.अशोक गायकवाड सुरवातीला रिपब्लिकन पक्षात होते. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे हे नीकटवर्तीय मानले जात होते. मात्र, आंदोलने आणि काही ध्येयधोरणांवरून त्यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र आघाडी उभारली. मराठा क्रांती मोर्चे सुरू असताना गायकवाड यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात निर्णय घेऊन नगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाची घोषणा केली. होती. सत्ताघारी पक्षासोबत असलेल्या आठवले यांच्यासाठी हे गैरसोयीच होते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव असलेले अशोक गायकवाड व विजय वाकचौरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.मधल्या काळात त्यांनी स्वतंत्र पक्ष संघटना उभी केली. मात्र, २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हाती शिवबंधन बांधले होते. सुरवातीला काही काळ त्यांनी पक्षात काम केले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे ते समर्थक होते. त्यानंतर आलेल्या निवडणुकांसाठी ते इच्छूक होते. मात्र, त्यांच्या मनासारखे शिवसेनेत काही घडत नव्हते. त्यामुळे मधल्या काळात ते शांत राहिले होते. मधल्या काळात त्यांना अनेकदा धमकीची पत्र आली होती. त्यासंबंधी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. जागेच्या वादातून ही पत्र येत असल्याचे उघड झाले होते.आता विधनसभा निवडणूक होऊन गेल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचा प्रवेश झाला आहे. आता त्यांना पक्षाकडून कोणते पद दिले जाते? याकडे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.