कार्बन मोनॉक्साईड इनसाईड.. डोन्ट स्वीच ऑन लाईट अशी सावधगिरी बाळगण्याची चिठ्ठी बंगल्याच्या बेडरुमच्या दरवाजाबाहेर चिकटवून कार्बन मोनॉक्साईड वायू प्राशन करून तरुणाने आत्महत्या केल्याची विचित्र अशी घटना वसई परिसरात घडली आहे. कार्बन मोनॉक्साईड इनसाईड.. डोन्ट स्वीच ऑन लाईट अशी सावधगिरी बाळगण्याची चिठ्ठी बंगल्याच्या बेडरुमच्या दरवाजाबाहेर चिकटवून कार्बन मोनॉक्साईड वायू प्राशन करून तरुणाने आत्महत्या केल्याची विचित्र अशी घटना वसई परिसरात घडली आहे. श्रेय अग्रवाल (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.वसई पूर्व परिसरात असलेल्या चिंचोटी- कामण परिसरातील स्पॅनिश विला नावाच्या बंगल्यात श्रेय अग्रवाल हा तरुण वास्तव्यास होता. मागील दोन दिवसांपासून श्रेयची बहीण त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्याच्या बहिणीने मुंबई पोलीस आयुक्तांना ईमेलद्वारे श्रेय अग्रवाल हा आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार केली. मुंबई गुन्हे शाखेने श्रेय अग्रवालच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते वसईच्या चिंचोटी- कामण परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबत अधिक तपास करण्यासाठी सदर घटनेची माहिती व श्रेय अग्रवाल याचे छायाचित्र नायगाव पोलिसांना देण्यात आले.










