शिंदेंचा शिलेदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, अजितदादांचा आमदारही जोडीला, म्हणाले, “दिशा सालियन प्रकरणात…”

विधानसभेत दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित होताच, भाजप नेते आक्रमक झाले. त्याचवेळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.दिशा सालियन प्रकरणी विधानसभेत आज (२० मार्च) गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यावेळी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या पाठीशी दोन आमदारांची ताकद उभी राहिल्याचे चित्र दिसले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी याचिका दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे यांचे देखील नाव असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सूरज पंचोली, दिनो मोर्यासह आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विधानसभेत दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित होताच, भाजप नेते आक्रमक झाले. त्याचवेळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.”दिशा सालियन प्रकरणात ज्यावेळी सीआयडी तपास करत होती त्यावेळी त्या तपासात कोणत्याही राजकीय व्यक्तिचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही. परंतु तपासाअंती जे समोर आले ते मी सांगतोय” असे संजय गायकवाड म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जर कोणाकडे काही पुरावे असतील तर ते त्याच वेळी द्यायला हवे होते. परंतु कोणतेही पुरावे नसल्यामुळे आदित्य ठाकरेंना क्लिन चीट देण्यात आली होती. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली ? इतकी दिरंगाई का केली गेली? असे प्रश्न राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी सभागृहात उपस्थित केले. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. असेही ते म्हणाले.
तर दुसरीकडे, रोहित पवार आदित्य ठाकरेंची पाठराखण करताना, “आदित्य ठाकरेंना मी जवळून ओळखतो. मला वाटतं कितीही काहीही केलं तरी आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा मला विश्वास आहे” असे म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.