दिशाच्या वडिलांचे खळबळजनक आरोप, आता सुशांतचे वडिलही समोर; लिंक सांगितल्यानं संशय वाढला.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दलचा संशय कायम आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू १४ जून २०२० रोजी झाला. सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या मृत्यूबद्दल खळबळजनक दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दलचा (Sushant Singh Rajput Death) संशय कायम आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू १४ जून २०२० रोजी झाला. सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या मृत्यूबद्दल खळबळजनक दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. लेकीची बलात्कार करुन हत्या झाल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाचा नव्यानं तपास करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर आता या सगळ्या घटनाक्रमावर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी भाष्य केलं आहे.सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियन या दोघांच्या मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा दावा सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी केला. ‘सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यूंचा सखोल तपास व्हायला हवा.

आम्ही पाटण्यात होतो. दिशाचा अपघात झाल्याचं आम्ही ऐकलं होतं. त्याला अपघात म्हटलं गेलं, तसं सांगितलं गेलं. पण तिला इमारतीवरुन धक्का देण्यात आला. ती सुशांतची माजी मॅनेजर होती. आम्ही तेच ऐकलेलं होतं,’ असं के. के. सिंह म्हणाले.सुशांतच्या वडिलांआधी दिशाचे वडील सतीश सालियन यांनीदेखील त्यांच्या लेकीच्या मृत्यूबद्दल खळबळजनक आरोप केले. माझी लेक आत्महत्या करु शकत नाही. तिची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. दिशाच्या मृत्यूचा संबंध सुशांत सिंह राजपूतशी आहे. या प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूबद्दल केलेल्या दाव्याबद्दल सुशांत सिंहचे वडील के. के. सिंह (Sushant Singh Father) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दिशाचे वडील मुंबईत राहतात. त्यामुळे त्यांनाच या प्रकरणाबद्दल माहीत आहे. मी तर आताच याबद्दल ऐकलं. याविषयी मी काय बोलणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.दिशाच्या वडिलांसारखाच सूर सुशांतच्या वडिलांनाही आळवला. ‘सुशांत कधी आत्महत्या करु शकत नाही. तो त्या प्रकारचा व्यक्तीच नव्हता. त्याच्या निधनाच्या एक आठवडा आधीच आमचं बोलणं झालं होतं. तो असं टोकाचं पाऊल उचलेलं असं त्यावेळी मला जराही वाटलं नव्हतं,’ असं सुशांतचे वडील म्हणाले. जोपर्यंत काही ठोस हाती लागत नाही, तोपर्यंत न्याय मिळाला हे आम्ही कसं मानायचं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.