पुण्यातील हिंजवडी येथे एका मिनी बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये गुरुदास लोकरे या व्यक्तीचं निधन झालं. या घटनेने त्यांचं कुटुंब मोठ्या आर्थित संकटात पडलं आहे.पुण्याच्या हिंजवडी येथील मिनी ट्रॅव्हल्समध्ये घडलेल्या आगीच्या घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या पायाच्या खालच्या बाजुला आग लागली आणि मग काहीच वेळात या आगीने भीषण रुप धारण केलं. या भीषण दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले होते.गुरुदास खंडू लोकरे यांचंही या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अंत्यत हालखीची आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










