दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या मृत्यूचा नव्यानं तपास व्हावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात केली आहे. शिवसेना उबाठाचे नेते, आमदार आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या मृत्यूचा नव्यानं तपास व्हावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात केली आहे. शिवसेना उबाठाचे नेते, आमदार आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात हाच मुद्दा गाजला. सत्ताधाऱ्यांनी शिवसेना उबाठाची कोंडी केली. यानंतर ठाकरेंचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी खिंड लढवत सत्ताधाऱ्यांवर प्रतिहल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नीच्या बाबतीत सनसनाटी दावा केला.’आदित्य ठाकरेंची केस कोर्टात गेल्या ५ वर्षांपासून सुरु आहे. यात सीबीआय, सीआयडी, एसआयटी चौकशी झाली. एसआयटी चौकशीचा अहवाल गेल्या दीड वर्षांत समोर का आणला नाही? या प्रकरणात एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.










