बीड पुन्हा हादरलं! तुला खल्लासच करतो म्हणत तरुणाला बेदम मारहाण, आणखी एक VIDEO व्हायरल.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका दलित मुलावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. संबंधित घटना अत्यंत धक्कादायक असून पीडित मुलाचे पैसे आणि मोबाईल हिसकावण्यात आले. चार जण मिळून या मुलाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव या प्रकरणात आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. शेवटी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. मात्र, सध्या बीड जिल्हातील मारहाणीचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकरचेही मारहाणीचे दोन व्हिडीओ तूफान व्हायरल झाले. शेतात नेऊन एकाला मारहाण करताना दादा खिंडकर दिसला. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्याने एका घरावर हल्ला केला.

आता बीडमधील अजून एक मारहाणीचा व्हिडीओ पुढे येतोय. हा व्हिडीओ बीडच्या अंबाजोगाई येथील असल्याचे कळतंय. शेतात नेऊन सेम स्टाईलने या मुलाला बेदम मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय. हेच नाही तर तुला खल्लासच करतो असे म्हणताना मारहाण करणारे दिसत आहेत. आता या तरुणाच्या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडीओ आहे.होलार समाजाचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून बेदम मारहाण करण्यात आली. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला.

धक्कादायक म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला, असा आरोपही केला जातोय. बीड पोलिस अधीक्षकांनी या मारहाणीची तात्काळ दखल घ्यावी. सर्व आरोपीला अटक करण्याचे आदेश द्यावेत. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे.तात्काळ आरोपीना अटक करून कायद्याचा जबर धाक दाखवला पाहिजे, असे दिपक केदार ऑल इंडिया पॅंथर सेना यांनी म्हटले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काहीजण मिळून या मुलाला मारहाण करत आहेत. हेच नाही तर एकाच वेळी तीन ते चार जण मिळून मारहाण करताना दिसत आहेत. कोणी डोक्यात, पाठीवर, मानेवर, पायावर, पोटात मारत आहे. यावेळी मारहाण करणाऱ्यांचा चेहरा हा स्पष्टपणे दिसतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे मोठी खळबळ निर्माण झालीये.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.