वेब सिरीज पाहिली अन् पतीच्या हत्येचा भयानक कट रचला, पोलिसांनी सांगितला मेरठ हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम.

उत्तरप्रदेशातून थरकाप उडवणारं हत्याकांड समोर आलं आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या करुन तिने मृतदेहाचे तुकडे करुन ते सिमेंट भरलेल्या पाण्याच्या टाकीत टाकले होते. याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.उत्तरप्रदेशातून थरकाप उडवणारं हत्याकांड समोर आलं आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या करुन तिने मृतदेहाचे तुकडे करुन ते सिमेंट भरलेल्या पाण्याच्या टाकीत टाकले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून मारेकरी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस तपासात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणाची सुरुवात २०१९ मध्ये झाली, जेव्हा पत्नी मुस्कान आणि प्रियकर साहिलची शाळेच्या ग्रुपमध्ये पुन्हा ओळख झाली होती. दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली. विवाहित असूनही मुस्कानने साहिलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठीच तिने पती सौरभला या मार्गातून हटवण्याचा कट रचला.मेरठचे एसपी आयुष बिक्रम सिंह यांनी पत्रकार परिषद हत्येचा घटनाक्रम सांगितला आहे. सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होता आणि त्यासाठी तो लंडनमध्ये काम करत होता. परंतु त्याची ती नोकरी सुटली. त्यानंतर तो एका बेकरीमध्ये काम करू लागला. मुस्कानच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने त्यांना सौरभ आवडत नव्हता. याचदरम्यान मुस्कान आणि साहिलचे प्रेमप्रकरण सुरू झाले. मुस्कान सौरभकडे वारंवार घटस्फोट मागत होती.

पण तो नकार देत होता. यानंतर दोघांनीही सौरभला मारण्याचा कट रचला. नोव्हेंबर २०२४ पासून या हत्येचे प्लॅनिंग केले जात होते. खून कसा करायचा आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, हे शिकण्यासाठी दोघांनीही अनेक वेब सिरीज एकत्र पाहिल्या होत्या.सौरभ २२ फेब्रुवारीला लंडनहून परतला आणि त्याचदिवशी हत्येचे प्लॅनिंग ठरले होते. परंतु हत्या करता आली नाही. त्यानंतर ३ मार्चला सौरभ इंदिरा नगर येथील त्याच्या घरी पोहोचला. मुस्कानने त्याच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळून त्याला बेशुद्ध केले. नंतर तिने साहिलला बोलवले. मुस्कानने कोंबडी कापण्यासाठी आधीच दोन चाकू खरेदी केले होते. जेव्हा सौरभ बेशुद्ध झाला तेव्हा मुस्कान त्याच्या पोटावर बसली. साहिलने चाकू मुस्कानच्या हातात दिला आणि तिला कुठे हल्ला करायचा ते सांगितले. त्यानंतर दोघांनी मिळून सौरभवर तीन वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन देखील केला होता. सुरुवातीला त्यांनी मृतदेह बेडमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला, पण ते अशक्य ठरत असताना साहिलने चाकूने मृतदेहाचे चार तुकडे केले. तर दुसरीकडे मुस्कानने आधीच १० किलो ब्लीचिंग पावडर ऑर्डर केली होती, ज्याने घर स्वच्छ केले गेले आणि रक्ताचे डाग मिटवण्यात आले. ४ मार्चला मुस्कानने बाजारातून ड्रम, सिमेंट आणि वाळू देखील खरेदी केली होती. दोघांनीही मृतदेहाचे अवयव एका ड्रममध्ये ठेवले आणि त्यात सिमेंट भरले आणि ते पॅक केले. जेणेकरून मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी येऊ नये आणि कोणालाही याचा सुगावा लागू नये.

एवढ्यावरच न थांबता हत्येनंतर दोघांनीही मेरठ ते शिमला-मनाली प्लॅनही केला. तेथे त्यांनी १३ दिवस मुक्काम केला आणि मंदिरात लग्नही केले. मुस्कानला एक ६ वर्षांची मुलगी देखील आहे, जी तिच्या आजीसोबत राहते.पुढे १७ मार्चला मुस्कान तिच्या माहेरी आली. मुस्कानला पाहताच तिची मुलगी सौरभला भेटण्याचा आग्रह धरू लागली. याचवेळी मुस्कानने तिच्या वडिलांना सांगितले की, तिने साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केली आहे. हे ऐकून त्याचे वडील थेट ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात गेले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.२४ फेब्रुवारीला सौरभ लंडनहून मेरठला आला आणि त्याच्या घरी पोहोचला
२५ फेब्रुवारीला पत्नीचा वाढदिवस आणि २८ फेब्रुवारीला मुलीचा वाढदिवसही साजरा केला  ४ मार्चच्या रात्री, त्याच्या पत्नीने त्याला जेवणात काही विषारी पदार्थ दिले आणि झोपवले ४ मार्चच्या रात्री तिने तिचा प्रियकर साहिलला घरी बोलावून त्याची हत्या केली  ५ मार्चला मुस्कान तिच्या प्रियकरासोबत शिमल्याला गेली १७ मार्चला मुस्कान शिमल्याहून परतली आणि तिच्या पालकांच्या घरी पोहोचल्यानंतर तिने तिच्या कुटुंबाला संपूर्ण घटनेची माहिती दिली  १८ मार्चला ती तिच्या वडिलांसोबत ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली  १८ मार्चला पोलिसांनी ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला. आरोपी साहिल आणि मुस्कानला अटक करण्यात आली

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.