30 वर्षीय दर्शित सेठ कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवर आला, गाडीतून उतरला अन् थेट समुद्रात घेतली उडी.

कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवरून उडी मारून तरूणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोस्टल रोड-सिलिंक कनेक्टवरून उडी मारून तरूणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत तरूण मालाड  येथील रहिवासी होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दर्शित राजूभाई सेठ (30) हा मालाड येथील रहिवासी असून तो पदवीधर होता. मंगळवारी कामावरून निघाल्यावर त्याने बीकेसीवरून वांद्रे-वरळी सीलिंकमार्गे वरळीला आला. सीलिंक कोस्टल रोडला जेथे जोडला जातो. त्या कनेक्टरवर त्याने कार थांबवली.

त्यानंतर थोडावेळ उभे राहून त्याने थेट समुद्रात उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी सागरी सेतू परिसरात त्याचा मृतदेह सापडला आहे. चार महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.दरम्यान, पळस्पे येथील एका इमारतीच्या 29 व्या मजल्यावरून पोटच्या मुलीस फेकून आईने स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना पनवेल येथे घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने पनवेल शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर, आशिष हरिश्चंद्र दुवा याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पतीचे अन्य स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने तो आपल्या मुलीला मारहाण करायचा. यातूनच तिचा छळ करून त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मयत महिलेच्या आईने केली होती. 12 मार्च रोजी पळस्पे फाटा येथील मॅरेथॉन नेक्सन औरा इमारतीच्या 29 व्या मजल्यावरून आठ वर्षीय मुलीला तिच्या आई मैथिलीने बेडरूमच्या खिडकीतून बाहेर फेकले होते. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मैथिलीनेही उडी मारून आत्महत्या केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.