प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, बीड जिल्ह्यात एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हांतील हाणामारीचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.. परीक्षांचा काळ सुरू असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यात सध्या विविध पक्षांच्या नेत्यांचे प्रमुख कार्यकर्त्यांशी संबंधित हाणामारीचे व्हिडीओ समोर येत आहेत. संबंधित नेत्यांचे कार्यकर्तेही त्याबाबत समर्थनासाठी आंदोलने करीत आहेत. मस्साजोग खुन प्रकरणात दबाव आल्यानंतर आणि मागणी जोर धरू लागल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतरही वाद शमण्याची चिन्हे नाहीत. दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी दोन एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.जिल्ह्यात विविध पक्ष-संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी विविध प्रकारची निदर्शने, आंदोलने, उपोषण, मोर्चे काढले जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात परीक्षांचा काळ सुरू असून यामुळे अचानक घडणाऱ्या घटना व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता जमावबंदी आदेश लागू करणे अत्यंत आवश्यक आहे, असे स्पष्ट मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले आहे.या काळात जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे यां सारख्या आंदोलनांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही. अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात येत आहे.शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणार नाहीत, असे निर्देश त्यात देण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला सीआयडीने त्यांच्या आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक बनवले आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मारहाणीचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्या याचेही धक्कादायक व्हिडीओ हे पुढे आले. सुरेश धस यांच्यावरही सातत्याने आरोप होत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.